जळगाव : भाजपचे निलेश राणे (BJP MP Nilesh Rane) यांनी आपला वाळूचा धंदा (sand) असल्याचा आरोप खोटा केला आहे. परंतू नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे (Narayan Rane) यांची तर हाऱ्या, नाऱ्याची गँग होती. याची आपल्याला माहिती आहे, असा सणसणीत टोला शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार नीलेश राणे जळगाव येथे सोमवारी (ता. ७) आले होते. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी श्री. राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांना मंगळवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मंत्री पाटील म्हणाले, की मराठा आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, केवळ विरोधक म्हणून नीलेश राणे यांना सरकारविरोधात टीका करणे भाग आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचा आरोप त्यांनी केला, तो साफ चुकीचा आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे त्यांना आपले खुले आव्हान आहे. आपला वाळूचा धंदा नाही. मात्र, नीलेश राणे यांच्या वडिलांची हऱ्या- नाऱ्याची गँग होती, याची आपल्याला चांगली माहिती आहे गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील शिवसेना आमदार daftar situs judi slot online terpercaya किशोर पाटील यांनी महावितरण कार्यालयास केलेल्या टाळा ठोको आंदोलनाचे समर्थन केले. शिवसैनिक आहे त्याला जेथे अन्याय दिसेल तेथे त्याविरुद्ध तो आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comment here