City News

ST गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू, यवतमाळमध्ये पुर

उमरखेड : गुलाब चक्रीवादाळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे. सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. मात्र, त्यावेळीच बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ५०१८ ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती.दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे. उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता. यामध्ये बस वाहून गेली आहे.
Yawatmal ST bus vanished in rain

Comment here