मुंबई – बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यामध्ये यापुढील काळामध्ये पोलिसांना किंवा इतर कुठल्याही यंत्रणेला चौकशी करायची असल्यास तीन दिवस अगोदर त्याची पूर्वकल्पना द्यावी. असे उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे तुर्तास आर्यनला न्यायालयानं दिलासा दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी म्हणून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली होती. त्याच्याकडे ड्रग्ज सापडले म्हणून त्याला काही दिवस चौकशीसाठी कोठडीतही ठेवण्यात आले होते.
आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं सांगितलं की, दर आठवड्याला मुंबईच्या एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट आर्यनला शिथिल करण्यात आली आहे. तसेच दिल्लीच्या एनसीबीला चौकशी करायाची आवश्यकता वाटली तर ७२ तास आधी आर्यनला नोटिस द्यावी लागेल त्यानंतर त्याची चौकशी होईल. असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी आर्यननं आपल्यावर ज्या जाचक अटी आहेत त्याच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्यामध्ये त्यानं त्या अटींचा सहानुभूतीनं विचार करुन त्या शिथिल करण्यात यावं असं म्हटलं होतं.
आर्यनला उच्च न्यायालयाचा दिलासा; चौकशीसाठी द्यावी लागेल पूर्वसुचना

Comment here