City News

कृषी विभागाकडून या खरीप हंगामात रासायनिक खताची दहा टक्के बचत करा …

Aurangabad, 10 June. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्ग आता सज्ज झाला असून दहा लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणार आहे या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया खरीप हंगामाचा पिक विमा रब्बी यातील सर्वच पिकाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये .असे संदेश वारंवार दिला जात आहे . या पार्श्वभूमीवर येथील विभागीय कृषी विभागांना या बीज प्रक्रियेचे तीन भाग केले आहेत एक बुरशीनाशकाची दुसरी कीटकनाशकाची आणि तिसरी अतिशय महत्त्वाची अशी आणि खत बचत करण्यास उपयुक्त अशी जैविक बीजप्रक्रिया आहे बाजरी मका ज्वारी या पिकांसाठी अझोटोबॅक्टर ची बीज प्रक्रिया करावी मुग , उडीद , तूर , या द्विदल पिकासाठी रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी .त्याच सोबत पीएसबी जैविक खताचा मोठे महत्व आहे पिकाला दिलेले समृद्ध हे योग्य पद्धतीने पिकाच्या मुळाजवळ आणण्याचे कार्य ही पीसीबी करतात त्यामुळे दिलेल्या स्फुरत खताचा कार्यक्षम उपयोग होतो आणि पीक जोमदार येण्यास मदत होते . त्यामुळेच या खरीपात बीज प्रक्रिया केल्याशिवाय खरीप पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी करू नयेत . अस आवाहन कृषी विभागाने केल आहे

Comment here