City News

चिकलठाणा विमानतळ ! अखेर विमानतळ विस्तारीकरणासाठी मुहूर्त सापडला.

Aurangabad, 15 June. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला विस्तारीकरणासाठी आणखी १८२ एकर जागा हवी आहे. मागील १० वर्षांपासून भूसंपादनाची निव्वळ चर्चा सुरू होती. चिकलठाणा विमानतळासाठी सध्या ५०० एकरपेक्षा अधिक जागा वापरात आहे. मोठ्या बोईंग विमानांसाठी धावपट्टी छोटी पडते आहे. विमानतळावरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमानांचे उड्डाण करण्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे
अलीकडेच भूमिअभिलेख विभागाकडे जमीन मोजण्यासाठी शासकीय फी भरण्यात आली. मंगळवारपासून मोजणीला सुरुवात होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले .नगरभूमापन अधिकारी गणेश सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली परिरक्षण भूमापक भास्कर बोचरे, प्रभारी शिरस्तेदार शेख आरीफ मोजणी करणार आहेत.

Comment here