City News

MSRTC merger soon, Awaiting GR

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे राज्यात सध्या एसटी सेवा बंद आहे. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीवर कामगार संघटना ठाम आहेत. दरम्यान एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याबाबत लवकरच जीआर जारी होणार आहे.

विलिनीकरणाबाबत अहवाल देण्यासाठी नेमण्यात येणार्‍या समितीत राज्याचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा सहभाग असेल. सूत्रांनी ही माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार ३ महिन्याच्या आत याबाबत अहवाल सादर करण्यात येईल.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा वाढल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी आवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणे मुश्‍किल झाले आहे. कोरोनामुळे महामंडळासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सर्व चालक, वाहकांनी आज कामबंद आंदोलन तीव्र केले असून राज्यातील महामंडळाच्या 250 पैकी 25 आगारातूनच बसेसवा सध्या सुरू आहे.गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन आणखीनच चिघळले असून ३० च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरच आज न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. न्यायालय जो आदेश देईल पालन करू, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

Comment here