City News

एल अँड टी फायनान्स कंपनी वर गुन्हा नोंदनों वा मनसेची मागणी पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन

जालना, 2 June. शेतकऱ्याचा ट्रॅक्टर व नांगर फाळ चोरणाऱ्या एल अँड टी फायनान्स कंपनी वर गुन्हा नोंदनों वा अशी मागणी मनसे ने जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देऊन केली आज
पोलिस अधीक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की , रामेश्वर प्रभाकर शेळके रा.माहोरा ता.जाफ्राबाद जि.जालना या शेतकऱ्याचे टॅक्टर व नागर फाळ रामेश्वर उत्तमराव रांधवन ( नातेवाईक )
ता.भोकरदन जि.जालना या शेतकऱ्याच्या शेताची नागरणी करीत असतांना शेतकऱ्याला न कळविता घेकायदेशीर पणे रात्री अंदाजे १२ ते १ च्या दरम्यान टॅक्टर व नांगर फाळ सह चोरीला गेले.तीन ते चार
दिवस तपास घेतला परंतू काही माहिती मिळाली नाही.त्यानंतर एल अॅण्ड टी फायनॉन्स कं.लि.च्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की , आधी ३ लाख रुपये भरा नाहीतर टॅक्टरची आम्ही
विल्हेवाट लावून टाकू या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची पुर्व कल्पना न देता कोरोना लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या टॅक्टर घेऊन गेले.करीता यांच्यावर योग्य ते तपास करून तात्काळ कारवाई करावी
. नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यासह कोविड -१ ९ च्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपले शासन जबाबदार राहिल यांची नोंदनों घ्यावी ही नम्र विनंती .

Comment here