Health & Fitness::CardioNational

ओमिक्रॉन : केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स; सीटी स्कॅनबाबत रुग्णांना सल्ला

नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे ) वेगाने संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या दर दिवशी ६ हजार वरून थेट जवळपास ६० हजार इतकी झाली आहे. यामुळे आता केंद्राने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने सौम्य लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान ७ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येईल. तसंच त्यांना किमान सलग तीन दिवस ताप नसेल तरच डिस्चार्ज आणि आय़सोलेशनपासून सुटका मिळेल. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणीची आवश्यकता नाही असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असून आता देशात रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.
नव्या नियमावलीनुसार केंद्र सरकारने कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच ट्रिपल लेअऱ मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे. होम आय़सोलेशनबाबत नव्या गाइडलान जारी करताना केंद्र सरकारने वयोवृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आयसोलेशनची परवानगी मिळेल. तसंच सौम्य लक्षणं असलेल्यांना व्हेंटिलेशन नीट असेल तरच घरी राहण्यासाठी परवानगी दिली जाईल. रुग्णांना जास्तीजास्त लिक्विड घेण्यासही सांगण्यात आलं आहे.
ज्या रुग्णांना एचआयव्ही, ट्रान्सप्लांट, कॅन्सर इत्यादी झालं असेल त्यांना आयसोलेशनसाठी डॉक्टरांच्या परवानगीची आवश्यकता असेल. लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांना घरी क्वारंटाइन राहता येईल. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटी स्कॅन आणि छातीचा एक्सरे काढू नये असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Comment here