Film & entertainment

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी पोस्ट करत असते. नुकतंच तिने तिच्या मुलाचा म्हणजे रायनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो त्याचे केशदान करताना दिसत आहे. कर्करोग दिनाचं औचित्य साधून रायनने कॅन्सर पीडितांसाठी केशदान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे.

माधुरीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मी एक खास गोष्ट शेअर करत आहे. रायनने काही कॅन्सर पीडित लोकांना पाहिलं आणि त्यांना पाहून त्याला खूप वाईट वाटलं. कॅन्सर पीडित अत्यंत कठीण काळाचा सामना करतात, उपचारादरम्यान त्यांचे केस गळू लागतात आणि ते पाहूनच माझ्या मुलाने कॅन्सर सोसायटीला केशदान करण्याचं ठरवलं आहे.’ तिने पुढे लिहिलं, ‘रायनला आवश्यक तेवढे केस वाढण्यासाठी जवळपास २ वर्षे लागली. आज आम्हा दोघांनाही त्याचा अभिमान आहे.’ या पोस्टमध्ये तिने पती डॉ. नेने यांनाही टॅग केलं आहे.

Comment here