City News

बँक हफ्ते वसुली बंद करा….खासदार इम्तियाज जलील यांची मागणी.

Aurangabad, May 22. कोरोनाच्या काळात ऑटोरिक्षा व इतर प्रवासी वाहनांची थकित बँक हप्ते वसूल करण्यासाठी गोरगरीब मालक व चालक यांना नाहकत्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खासगी रिकव्हरी एजंटना त्वरित पायबंद करावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे चालक मालकांनी केली.याच अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पोलीस आयुक्तांना हे थांबवण्यासाठी निवेदन दिले.
खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले की वाहनाचे गोरगरीब मालक व चालक त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे अशात जिल्ह्यातील खाजगी बँका व फायनान्स कंपन्यांनी बँकेचे हप्ते वसुली करण्यासाठी बाऊन्सर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोर गरीब मालक व चालक यांच्याकडे सकाळी व मध्यरात्रीच्या वेळी पाठवत आहे. सर्रासपणे अर्वाच्च भाषेचा वापर करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करत असल्याचे खासदार इम्तियाज अली यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोणाच्या काळात ऑटोरिक्षा काळीपिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहनांचे हफ्ते वसुली थांबले नाही पण सर्वच गोरगरीब चालक-मालक हे त्यांच्याजवळील वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहेत. वाहणे जमा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व चालक-मालक त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दररोज प्रत्येकी 1000 रुपये द्यावे अन्यथा सर्वासोबत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करेल असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे.

Comment here