City News

Laal Pari : आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिन

Aurangabad, 1 June. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली व “लाल परी” म्हणून ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एसटी (स्टेट ट्रान्सपोर्ट) बस ची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली.
१९४७साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महाराष्ट्र हे राज्यच अस्तित्वात नव्हतं. तेव्हा सरकारी वाहतूक ’बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन(BSRTC)’ या नावाने चालत असे. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे वेगळा महाराष्ट्र बनल्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या भागातली वाहतूक सेवा आणि BSRTC यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच MSRTC ची स्थापना करण्यात आली. आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत. लालपरी पासून सुरू झालेला हा एस. टी. चा प्रवास परिवर्तन, अशियाद, निमआराम बस, हिरकणी, शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही अश्या अनेक प्रकारातून आज शिवशाही स्लीपर कोच पर्यंत येऊन पोहचला आहे. परिवर्तन बस, एशियाड बस शिवनेरी शिवशाही व आता निमारं आता वातानुकूलित स्लीपर कोच पर्यंतचा प्रवास पोहोचला आहे. शहरांतून इतकं जाणवत नसलं तरी ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही लाल डब्याला पर्याय नाही. अबाल वृद्ध, विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, आजारी रुग्ण, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना विशेष सवलत देण्याचे काम एस टी करत आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी साठीची मोफत प्रवास योजना, यामुळे ग्रामीण भागातील मुली शहरात शिक्षणासाठी जाण्याची व्यवस्था मोफत झाली त्यामुळे मुलीचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. एस टी च प्रवास हा सुरक्षित आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोणा सारख्या महामारी मध्ये आपला जीव धोक्यात टाकून चालक वाहक व इतर सर्व जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. ही बाब नक्कीच गौरवास्पद आहे.अश्या जवळ पास ३५ विभागातून ३०० च्या आगारातून आपणास सारख्या सर्वसामान्यांची सेवा एस टी आजतागायत करीत आहे. अश्या या एस टी च्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी चे सर्व पदाधिकारी वाहक, सर्व तांत्रिक कर्मचारी, प्रवाशांना मनःपूर्वक शुभेच्छा,

Comment here