Business & AuctionsCity News

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; DA,DR मुळे वाढला HRA

7th Pay Commission : सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि DR (Dearness Relief) मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ झाली आहे. त्यासोबतच इतर भत्ताही वाढला आहे. याचा सर्वात जास्त फायदा HRA मध्ये झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे जानेवारी 2020 पासून जून 2021 पर्यंत डीए आणि डीआरसह इतर सर्व भत्त्यांमध्यो कोणताही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

केंद्र सरकारने एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 28 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि डीआरमध्ये 11 टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या 48 लाखांपेक्षा जास्त क्रमचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला आहे. DA चा नवीन दर आता 17 टक्केंनी वाढून 28 टक्के झाला आहे. डीएसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाऊंस (HRA) मध्येही बदल झाला आहे. सरकारने HRA ला वाढवून 27 टक्के केला आहे. डीआर आणि डीएसोबतच एचआरए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. एकप्रकरणारे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

Comment here