City News

औरंगाबाद जिल्ह्याबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले ६ मोठे निर्णय

तुम्हें ने दर्द दिया तुम्ही दावा देना - औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४४ निजामकालीन शाळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची दूरवस्था आणि सातारा-देवळाईमधील भूमिगत मलनि:सारणाची समस्या दूर होणार आहे. तसंच श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.  उद्ध‌व ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत 'वर्षा' येथील बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरू करा...औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत, वसतीगृह तयार आहे. मात्र, अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असं सांगण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसंच ट्रस्टची पुनर्रचना करुन संतपीठात शैक्षणिक वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. संतपीठ विद्यापीठ करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले.

Comment here