State News

मॉन्सूनची मुसंडी; राज्यात जोरदार पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (मॉन्सून) अवघ्या चार दिवसांमध्ये बुधवारी बहुतांश राज्य व्यापले. मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात त्याने हजेरी लावली. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या उर्वरित भागातही मॉन्सून दाखल होईल, असे पोषक वातावरण असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.मॉन्सूनने रविवारी (ता. ६) पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वेळेआधीच दाखल होणाऱ्या मॉन्सूनने त्यानंतर दोन दिवस कोणतीही वाटचाल केली नव्हती. त्याने राज्यातच मुक्काम ठोकला होता. मॉन्सूनचे प्रवाह पुन्हा सक्रिय झाल्याने मुंबई, कोकण, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत बुधवारी वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस सुरू झाला. पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात पहाटेपासूनच पावसाने चांगलाच दणका दिला असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मॉन्सूनने गुजरातच्या वलसाड, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील नागपूरपर्यंत मजल मारली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ११) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. १०१ टक्के पावसाचा अंदाज, अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मॉन्सून गुरुवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. रविवारी (ता. ६) तब्बल चार दिवस आधीच पुण्यात हजेरी लावली होती. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.

Comment here