City News

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. कच्च्या तेलातील दरवाढीने कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी अपेक्षेनुसार दरवाढीचा सपाटा लावला आहे. कंपन्यांनी आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल दरात ३१ पैसे वाढ झाली आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. तर बुधवारी पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले होते.

Comment here