State News

Ajit pawar slams chandrakant patil over GST issue

कोल्हापूर: जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. (ajit pawar slams chandrakant patil over GST issue)

अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला. 15 जूननंतर म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन येतील
म्युकरमायकोसिस आजारामुळे मृतांची आकडेवारी वाढत आहे. ही वस्तुस्थिती आहे. या आजारावरील सर्व इंजेक्शन्स केंद्राच्या अख्त्यारीत आहेत. रुग्णांच्या प्रमाणात ही इंजेक्शन मिळावीत अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं. 15 जूननंतर ही इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणावर मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा
कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा. उलट कोरोनाचा संसर्ग वाढला तर कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असं सांगतानाच कोल्हापुरातील 12 जिल्ह्यात जिथे लसीकरण झालंय, तिथे पॉझिटिव्हिटी रेट थोडा कमी आहे. त्यामुळे लसीकरणावर भर असेल. जशी लस उपलब्ध होईल, तशी ती उपलब्ध करुन दिली जाईल, असं ते म्हणाले. (ajit pawar slams chandrakant patil over GST issue)

Comment here