State News

रत्नागिरीत कोसळधार, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती

रत्नागिरी : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. रात्री पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण मधल्या वशिष्ठी नदीला पूर आलाय. चिपळूण बाजार पेठेधल्या सखल भागात पाणी साचलं होतं. सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी ओसरायला हळूहळू सुरुवात झाली.

रत्नागिरीत मुसळधार, अर्जुना नदीला पूर

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आलाय. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी आलंय. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेव्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय.

घाटात दरड कोसळून ट्रॅफिक जाम, वाहतूक पुन्हा सुरळित

रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी जवळच्या निवळी घाटात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. जोरदार पावसाने घाटात दरड कोसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळली होती. सकाळी सात नंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

Comment here