City News

Increase in Covid in Childrens in Aurangabad, Treated 15 critical child patients

Aurangabad, 24 May. करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेही बाधित होत असून, तीन आठवड्यांत १५ अतिगंभीर बालरुग्णांवर उपचार केले. या बालकांनी करोनावर यशस्वी मात केल्याची माहिती एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. विनोद इंगळे यांनी दिली. डॉ. इंगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बालरुग्णांवरील उपचारांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘बालरुग्णांमध्येही गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. एमजीएममध्ये मागील तीन आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या १५ अतिगंभीर बालकांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयात एक बालरुग्णाचे वय तेरा महिने होते. त्याचा स्कोअर १४ होता. दोन रुग्ण असे होते की ज्यांचा ताप मेंदूपर्यंत गेल्याने मेंदूला सूज आली होती. दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांबरोबरच नवजात शिशूंमध्येही
करोना प्रादुर्भाव वाढला आहे. एमजीएमने बालरुग्णांसाठी ४० सर्वसाधारण व वीस आयसीयू बेड राखीव ठेवले आहेत.’ पत्रकार परिषदेला संस्थेचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, व्हाइस चेअरमन डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा यांचीही उपस्थिती होती.

Comment here