City News

बुडालेली ‘ती’ कार अखेर 12 तासांनी बाहेर काढली

मुंबई: घाटकोपर परिसरातील एका खासगी इमारतीच्या परिसरातील विहिरीत बुडालेली कार अखेर 12 तासांनी बाहेर काढण्यात आली. रविवारी सकाळी ही कार विहिरीत बुडाली (Car Drown) होती. या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. मात्र, सोसायटीने ती विहीर बुजवून त्यावर आरसीसी बांधकाम केले होते. त्यानंतर विहीरीचा भाग गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरला जात होता. (car drown in ghatkopar into well) गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जमीन भुसभुशीत झाली होती. अखेर रविवारी सकाळी याठिकाणी खड्डा पडून कार अवघ्या काही मिनिटांमध्ये विहिरीत बुडाली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करुन क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. ही कार बाहेर काढली तेव्हा तिची अवस्था बघण्यासारखी झाली होती.

Comment here