Beauty & HealthCook The Tasty

भारतात येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR चाचणी बंधनकारक

नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवाशांना हा निगेटिव्ह रिपोर्ट वेब पोर्टलवर अपलोड करायचा असून त्याचबरोबर स्वघोषणापत्रही द्यावं लागणार आहे.भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी असे आहेत नवे नियम?

१) प्रवासाचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्रवाशांना स्वघोषणा पत्र एअर सुविधा पोर्टलवर (www.newdelhiairport.in) अपलोड करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर ७२ तासांत केलेला कोविडचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्टही याच पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. जर रिपोर्टमध्ये काही फसवणूक आढळून आल्यास त्यावर कायदेशीर जबाबदारी रहावी यासाठी यामध्ये स्वघोषणा पत्रही द्यावं लागणार आहे.२) ज्या देशांनी भारतीयांना क्वारंटाइन फ्री सुविधा पुरवली आहे. या देशांना ‘ए’ कॅटेगिरीत गणना करुन त्यांच्या नागरिकांना भारतात प्रवेश देताना क्वारंटाइनच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. पण या प्रवाशांना त्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणं बंधनकारक आहे.

३) सर्व प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एअर सुविधा पोर्टलवर ज्या प्रवाशांनी स्वघोषणापत्र आणि निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणीचं प्रमाणपत्र अपलोड केलं आहे. त्यांनाच विमानांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

४) थर्मल स्क्रिनिंगनंतर केवळ लक्षण नसणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश दिला जाईल.५) ए कॅटेगिरी प्रवाशांनी जर पूर्णपणे लसीकरण झालं असेल तर त्यांना विमानतळातून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. भारतात आगमनानंतरही 14 दिवसांसाठी त्यांना स्वतःच्या आरोग्याची देखरेख करणे आवश्यक आहे. जर अंशतः लसीकरण केले गेले किंवा लसीकरण केले नाही, तर प्रवाशांनी खालील उपाय करणे आवश्यक आहे. आगमनानंतर कोविड -19 चाचणीसाठी नमुना सादर करणे, त्यानंतर त्यांना विमानतळ 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन आणि भारतात आल्याच्या 8 व्या दिवशी पुन्हा चाचणी आणि नकारात्मक असल्यास पुढील 7 दिवसांसाठी त्यांच्या आरोग्यावर अधिक लक्ष ठेवणं बंधनकारक आहे.

६) जर प्रवासी ए कॅटेगिरी अंतर्गत समाविष्ट असलेल्या देशांऐवजी दुसऱ्या देशातून येत असेल, तर त्यांना कोविड लसीकरणाऐवजी वर नमूद केल्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

७) रिस्कमध्ये असलेल्या देशांना वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळातून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल आणि आगमनानंतर 14 दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख केली जाईल.

८) आंतरराष्ट्रीय प्रवाशांना (विमान, जहाजांद्वारे) समान प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. सध्या अशा प्रवाशांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध नाही. असे प्रवासी आगमन झाल्यावर भारत सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्वयं-घोषणा पत्र सादर करतील.

Comment here