City News

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत केले आंदोलन

Aurangabad, 7 June. एकीकडे कॉरोनाचा संसर्ग वाढत आहे तर दुसरी कडे केंद्रातील मोदी सरकार नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल डिझेल आणि खाद्यतेलाचे दर वाढवून नागरिकांवर अन्याय करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीची आवश्यकता आहे, ते देशवासियांना न देता विदेशात पाठविली जात आहे. केंद्र सरकारने देशवासियांना सर्व प्रथम लस उपलब्ध करून द्यावी तसेच पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर कमी करावे अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिला काँग्रेस तर्फे देशासह राज्यभर पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून
७ जुन रोजी जालना रोड वरील राज पेट्रोल पंप समोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. डॉ. कल्याण काळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष.

 

Comment here