National

PM मोदींची सुरक्षा, पंजाबने ब्लू बूकच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

दिल्ली – पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीमुळे सध्या देशात नवी चर्चा सुरु झाली आहे. पंजाबमध्ये (Punjab) गेल्यानंतर मोदींना सुरक्षेच्या कारणास्तवर दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परत यावं लागलं. यानंतर आता गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुलासा केला आहे. पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत आधीच माहिती मिळाली होती तरीही त्यांनी ब्लू बुकच्या नियमांचे पालन केले नाही असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
पंजाब पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून आंदोलकांबाबत आधीच माहिती मिळाली होती. मात्र तरीही त्यांनी पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये पोहोचले तेव्हा ब्लू बूकच्या नियमांचे पालन केले नाही आणि दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी आवश्यक त्या हालचाली केल्या नाहीत असं गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीच्या ब्लूकमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठीची मार्गदर्शक तत्वे असतात.
ब्लू बुकनुसार पंजाबमध्ये जर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर राज्याच्या पोलिसांना आपत्कालीन स्थितीत मार्ग तयार ठेवावा लागतो. गुप्तचर संस्थेचे अधिकारी पंजाब पोलिसांशी संपर्कात होते. त्यांना आंदोलकांबाबत माहितीही देण्यात आली होती. यानंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षेबाबत आश्वासन दिलं होतं अशीही माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी कमांडोंकडे असते. त्यांचे जवान पंतप्रधानांच्या आजुबाजुला असतात. मात्र इतर सर्व व्यवस्था ही राज्य सरकारची असते. त्यात बदल झाल्यास राज्याचे पोलिस एसपीजीकडे माहिती देण्यात येते आणि कार्यक्रमात बदल होतो असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचं म्हटलं आहे. तसंच याचा अहवाल गृहमंत्रालयासमोर सादर कऱण्याचे आदेशही दिले आहेत. तर दुसरीकडे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Comment here