City News

Aurangabad Hotelier got Bunty & Babli dose

Aurangabad, 23 June. विश्वजित दत्ता आणि शुभांगी दत्ता (सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. १६ जून २०२० रोजी आरोपी दाम्पत्य एन ५ येथील हॉटेल द लिफमध्ये रूम करून राहण्यास आले. या दाम्पत्याने आधी १६ हजार रुपये आगाऊ रक्कम जमा केली. त्यानंतर ते वर्षभर या हॉटेलमध्ये राहिले. हॉटेल व्यवस्थापक ज्ञानेश्वर सदाशिव पुरी (३९, रा. एन ५, सिडको) यांनी बिल भरण्यास सांगितले असता, लॉकडाऊन, कोरोना अशी वेगवेगळी कारणे सांगून बिल देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. ५ नोव्हेंबर २०२० रोजी दत्ता यांची पत्नी शुभांगी यांच्या बँक खात्याचा १ लाख रुपये स्कमेचा चेक दिला.
पण हा चेक वठला नाही. त्यामुळे व्यवस्थापकाने या दाम्पत्याला रूम रिकामी करण्यास सांगितले. मात्र ते गेले नाहीत. त्यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी १ लाख ८५ हजार रुपयांचा दिलेला दुसरा चेकही वठला नाही.
यानंतर विश्वजित याने २६ नोव्हेंबर २०२० रोजी आणि १४ जानेवारी २०२१ रोजी ४ लाख ४८ हजार रुपयांचे दोन वेगवेगळे चेक हॉटेलला दिले. हे चेकही वठले नाहीत. काही दिवसांनी, तुमचे पैसे आणून देतो, असे सांगून विश्वजित हॉटेलमधून बाहेर पडला. तसेच ३ जून २०२१ रोजी) हॉटेल व्यवस्थापनाला न कळविता शुभांगीने हॉटेल सोडले. त्यावेळी त्यांचे हॉटेलचे एकूण बिल ७ लाख ४१ हजार २१६ रुपये झाले होते. या दाम्पत्याने आपला विश्वासघात केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यानंतर पुरी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

Comment here