City News

जळगाव रोडवरील खेतेश्वर पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात, एक चालक गंभीर जखमी

औरंगाबादहून रावेरकडे जाणाऱ्या बसचे (एम एच ४० वाय ५१८६) समोरील टायर फुटल्यामुळे बसवरील ताबा सुटल्याने समोरून येणारी जळगाव – पुणे बस (एम एच २० बी एल ४०९५) वर चालकाच्या बाजूने धडकल्याने हा अपघात घडला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या अपघातात औरंगाबाद – रावेर बसचा चालक मोसीन शेख (वय ४०, रा.फैजपूर) यांच्या पायाला आणि डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात दोन्ही बसमधील अनेक प्रवाशीदेखील किरकोळ जखमी झालेत. मात्र ते स्वतःच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत. यावेळी या अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड आगार प्रमुख आनंद चव्हाण, लेखाकार कृष्णा कावले, वाहतूक नियंत्रक रंगराव भोटकर, सरफराज पठाण, लिपिक बाबूराव पंडित यांच्यासह महामंडळाच्या अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करून कार्यालयीन पंचनामा केला. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना इतर बसमध्ये बसविण्यात आले. तसेच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Comment here