City News

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Aurangabad, 3 June. बैठकीत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1995 अन्वये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. मार्च महिन्यात शहर हद्दीत चार तर ग्रामीण भागात 13 प्रकरणे घडली. यात दोन बलात्कार, पाच विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ इतर पाच प्रकरणांचा समावेश आहे. तर एप्रिल महिन्यातील सात प्रकरणांमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग आणि चार इतर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी दिली. या गुन्ह्यांमध्ये वाढ होणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीस पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोंखे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

Comment here