City News

VIP Dog stolen, got VIP search found within 4 hours

Aurangabad, 6 June. VIP Dog : थोडक्यात सविस्तर सहकार नगर N 5 सिडको येथील काल दिनांक 04/06/21 वार शुक्रवार सायंकाळी 5:30 वाजे दरम्यान डेप्युटी कलेक्टर मॅडम सरिता सुत्रावे यांचा लॅब्रो डाॅग अचानकपणे गायब , दिसेनासा झाला ,त्यांनी ताबडतोब N-7 सिडको पोलीस स्टेशन ला जावुन रितसर तक्रार दाखल केली ,नंतर घरी आल्यावर त्यांनी CCTV फुटेज बघीतले असता एका मोटारसायकल बाईक ,टु व्हीलर वर बसुन तीघे जण आल्याचे दिसले त्यातला एक जण व्यक्ती खाली उतरला व डाॅगी लुफी ला कसले तरी आमीष दिले असावे त्यामुळे ,सदर व्यक्तीने त्याला उचलुन घेत बाईक वर बसवुन चोरून नेले असल्याचे कळाले,तक्रार दिल्यानंतर ही त्यांनी ही खुप शोधाशोध केली परंतु डाॅगी लुफी मिळुन आला नाही “सुत्रावे परिवारास. रात्रभर झोप लागली नाही ,दुसऱ्या दिवशी ही सकाळ पासुनच शोध सुरु केला , नौकरी दरम्यान श्री घनश्याम सोनवणे साहेब यांचा परीचय असल्याने सुत्रावे मॅडम यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली, दुपारी दिड वाजता घरी जाऊन पाहणी करुन CCTV फुटेज आधारे ,गुप्त बातमीदार मार्फत ,शोध सुरु झाला व अवघ्या चार तासांत “डाॅगी लुफी”चा शोध लावला व पुंडलिक नगर पोलीस स्टेशन ला मॅडम ला बोलावून घेतले व लुफी ला बघुन सुत्रावे परिवारास आनंद अश्रु अनावर झाले,अशक्य ते शक्य चॅलेंजिंग काम केले असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यातही उत्साहाचे आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले डेप्युटी कलेक्टर मॅडम सरिता सुत्रावे यांनी फोनवर पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मिना मकवाना मॅडम सोबत फोनवर संभाषण करत पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे आमचा डाॅगी लुफी परत मिळाला असल्याचे कळवले “लुफी ला सुत्रावे परिवारास स्वाधीन करण्यात आले”,या कामी पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब , पोलीस उपायुक्त श्रीमती मिना मकवाना मॅडम सह ईतर ही अधिकारी व कर्मचारी सह श्री घनश्याम सोनवणे,API पुंडलिक नगर पोलीस स्टेशन ,स्टाॅफ शिवाजी गायकवाड,रमेश सांगळे,अजय कांबळे,ईमरान अथर, बाळाराम चौरे आदींनी परिश्रम घेतले .

Comment here