World

केनिया दुष्काळाच्या छायेत! मृत जिराफांची हृदयद्रावक छायाचित्रे समोर

केनियाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि अन्नाअभावी वन्यप्राण्यांचा बळी जात आहे. दुष्काळाचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. जिराफांच्या मृत्यूची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी हृदयद्रावक आहेत. भुकेने आणि तहानणे मृतावस्थेत पडलेल्या काही जिराफांची हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. केनियाच्या ईशान्येकडील वझीर शहरातील साबुली वन्यजीव अभयारण्यात सहा जिराफ मृतावस्थेत पडलेले दिसतात.

अन्न आणि पाण्याअभावी कमकुवत झालेल्या जिराफांच्या मृत्यूनंतर ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. जिराफ जवळच्या कोरड्या जलाशयातून पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होते. यादरम्यान चिखलात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. तेथून त्यांचे मृतदेह वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले आणि तेथे छायाचित्रे घेण्यात आली. जलाशयातील पाणी दूषित होऊ नये म्हणून तेथून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे छायाचित्र १० डिसेंबर रोजी काढण्यात आले.

Comment here