City News

Encounter specialist Pradeep Sharma house raided byNIA

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. एनआयएने प्रदिप शर्मा यांच्या अंधेरीच्या घरी छापा टाकला आहे. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती आहे. सकाळी सहा वाजलापासून एनआयएची टीम प्रदिप शर्मा यांच्या घरी आहे.

सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता एनआयएची टीम जेबीनगर मध्ये दाखल झाली. एनआयएची टीम, सीआरपीएफ १० ते १२ गाडया घटनास्थळी आहेत. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. भगवान भवन या अंधेरीतील इमारतीत ही चौकशी सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आल्याने विविध तर्क लावण्यात येत आहे. अंधेरीतला हा उच्चभ्रू परिसर आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा याच्या घरी NIA नं कारवाई केली आहे. या प्रकरणात या पूर्वी शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी झाली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेतले होते असे सूञांनी सांगितलं.या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाजे यांची अंधेरीत मिटिंग झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं

Comment here