State News

अनूप चंद्र पांडेय; निवडणूक आयुक्तपदी योगींचे होते मुख्य सचिव

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी (निवृत्त) अनूप चंद्र पांडेय यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. अनूप चंद्र 1964 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांना 37 वर्ष भारतीय प्रशासकीय सेवेतील अनुभव आहे. माजी आयएएस अधिकारी अनूप चंद्र पांडेय यांना मंगळवारी नवा निवडणूक आयुक्त म्हणून घोषित करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (UP cadre IAS officer Anup Chandra Pandey appointed Election Commissioner)
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोडा यांचा कार्यकाळ 12 एप्रिलला पूर्ण झाला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. कायदा मंत्रालयाच्या विभागाने सांगितलं की, राष्ट्रपतींनी 1984 बॅचचे सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी पांडेय यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केलं आहे. सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर राजीव कुमार निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयोगात तीन सदस्य असतात. येत्या काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनीपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीकोणातून पांडेय यांच्या नियुक्तीकडे पाहिलं जातंय.

Comment here