City News

हॉटेलमध्ये खराब जेवण मिळालं? 1 ऑक्टोबरपासून तात्काळ तक्रार नोंदवता येणार

अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच पण जेवणही खराब दिलं जातं. नवी दिल्ली : अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकतं. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी 1 ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केलाय. यानुसार बिलमध्ये FSSAI लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केलंय. याबाबत FSSAI ने एक आदेश जारी केलाय. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत किंवा इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक FSSAI नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात (FSSAI number compulsion to help customer in complaint registration against hotels and restaurants serving bad food). अन्न सुरक्षा विभागाने आदेश जारी करत म्हटलं, “प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरु करण्याआधी FSSAI परवाना किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा FSSAI नंबर ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसेल तर त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.”

Comment here