City News

जुन्या शहराची ओळख असलेले नेहरुभवन पाडून या जागेवर महापालिकेने दोन मजली शॉपिंग सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे.

Aurangabad, 10 June. Nehru Bhavan. या कामासाठी 32 कोटी 1 लाख 93 हजार रुपयांची निविदाही अंतिम केली आहे. या शॉपिंग सेंटरमध्ये दुकाने थाटू इच्छिणार्‍या व्यावसायिकांकडूनच निधी उभा केला जाणार आहे. मात्र तूर्तास या प्रकल्पासाठी पालिकेला स्वतःचा निधी गुंतवावा लागणार असल्याचे मानले जात आहे.

मागील काही वर्षांपासून जुन्या शहरातील आमखास मैदानाजवळील नेहरुभवनची वास्तू विनावापराची पडून आहे. आजघडीला या वास्तूची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दरम्यान, 2018 मध्ये ही इमारत पुन्हा नव्या रुपात वापरात आणण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी यासाठी पुढाकार घेत पालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांना नेहरुभवनच्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवणास सांगितले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा मंजूर झाल्यावर नेहरुभवनच्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा प्रस्ताव पालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी 11 मे 2021 रोजी घेतला. आता या प्रस्तावानुसार 4800 चौरस मीटर क्षेत्रावर 7914 चौरस मीटरचे बांधकाम केले जाणार आहे. त्यात तळमजला 2283 चौरस मीटरचा असेल. त्यात 20 दुकाने, एक अँकर शॉप आणि एक प्रदर्शनी हॉल असेल. पहिल्या मजल्याचे एकूण बांधीव क्षेत्र 2063 चौरस मीटर असून त्यात पाचशे आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, एक स्टोअर रुम, वीस दुकाने, एक अँकर शॉ़प आणि एक प्रदर्शनी गॅलरी असणार आहे. 52 कार्यालये आणि एक खुली गच्ची (ओपन टेरेस) याच मजल्यावर तयार केली जाणार आहे. भूमजल्यात सुमारे नव्वद चारचाकी वाहने उभ्या करता येतील एवढी मोठी पार्किंग तयार केली जाणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास आयुक्‍तांनी नुकतीच मंजूरी दिलेली आहे.

Comment here