Birthday Wishes

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी म्हणाली ‘मी सिंगल’, बाहेर पडताच बदललं जास्मीनचं रिलेशनशीप स्टेटस!

मुंबई : टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत आहे. ‘दिल तो हैप्पी है जी, ‘नागिन’ आणि ‘दिल से दिल तक’ अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली होती. नुकतीच जास्मीन ‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोचा भाग बनली होती. या शोपासून जास्मीनही चर्चेचा भाग राहिली आहे. जास्मीन आज तिचा 31वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 28 जून 1990 रोजी कोटा येथे झाला होता

बिग बॉस 14मध्ये भाग घेण्यापूर्वी जास्मीनने टीव्ही 9ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, ती अद्याप सिंगल आहे आणि शोमध्ये देखील ती सिंगलच असेल. एवढेच नाही, तर जास्मीनने असेही म्हटले होते की, बिग बॉसमध्ये तिचे प्रेम जुळूचं शकत नाही. पण जास्मीनचा हा दावा पूर्णपणे उलट असल्याचे सिद्ध झाले.

Comment here