City News

700 mm Main commercial water pipe line brust in pimpalwadi, paithan road, Aurangabad.

Aurangabad, 3 June. पैठण रोडवर पिंपळवाडी येथे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बुधवारी दुपारी अचानक फुटली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा बंद करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीसाठी २४ तासांचा अवधी लागणार आहे. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होईल.

पिंपळवाडी गावाजवळ बुधवारी दुपारी २.१५ वाजता जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनी फुटताच जवळच असलेल्या घरांत पाण्याचे मोठे फवारे उडाले. संबंधित घरांत पाणी शिरून तेथील रहिवाशांची एकच धावपळ उडाली. जलवाहिनी मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे कळताच जायकवाडीतून जुन्या योजनेवरील पाण्याचा उपसा बंद करण्यात आला. पाण्याच्या दाबामुळे या जागेत मोठा खड्डा होऊन त्यात पाणी साचले. उपसा बंद करेपर्यंत वाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. नंतर खोदकाम हाती घेण्यात आले. ३० एमएलडी पाणी कमी येणार
दुरुस्तीच्या कामात किमान २४ तास जलवाहिनी बंद राहणार आहे. शहरात ३० एमएलडी पाणी कमी येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. गुरुवारी काही भागांत तीन- चार तास उशिराने, तर काही भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलावे लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले. वाहिनी फुटून पाइपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे पूर्ण पाइपच बदलावा लागणार आहे, असे धांडे यांनी स्पष्ट केले.

Comment here