Film & entertainment

समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो आला समोर

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी काही फोटोही समोर आणले आहेत. नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं की मलिक इतका विषय मांडतायत त्यातून दिसतंय की काहीतरी गडबड आहे.नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिला आहे. हा फोटो एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचंही सांगण्यात येतंय. याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नसली तरी मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होत आहे.समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉक्टर शबाना कुरेशी हिच्याशी झाल्याचा दावा केला जात आहे. २००६ मध्ये समीर वानखेडेंचे लग्न शबाना यांच्याशी झाल्याचं म्हटलं जातंय. तेव्हाचा पूर्ण फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातीलच समीर वानखेडे यांचा फोटो क्रॉप करून नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Comment here