State News

Omicron : राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत

राज्यात कोरोना रुग्णांची (Covid19) संख्या ११४९२ आहे. २० जानेवारी दरम्यान, पाच सहा हजार असणारा आकडा आज तब्बल ११ हजारांवर पोहोचला असून, तो २० हजारांवर जाऊ शकतो. मुंबईत (Mumbai) २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. रोज २००० च्या पुढे केसेस समोर येण्याची शक्यता असून, या परीस्थितीत काळजी घ्यावी लागणार आहे. निर्बंध वाढवावे लागू शकतात असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबईत बाधित होण्याचं प्रमाण ४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. दिल्लीत आज सर्व कार्यक्रमांवर निर्बंध आहे, मात्र आपल्याकडे सर्व कार्यक्रम सूरू आहेत. आपल्याला निर्बंध पाळावे लागतील. आपण नियम पाळले नाहीत, तर निर्बंध वाढवावे लागती. मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून लवकरच हा निर्णय घेतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होणं हे ओमिक्रॉनपेक्षा चिंतेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Comment here