Film & entertainment

बॉलीवूडचा संजूबाबा ‘द गुड’ मध्ये ‘नवानगरचा महाराज’

बॉलीवूडचा बाबा अर्थात संजूबाबा हा नेहमी त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यानं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यास प्राधान्य दिले आहे. येत्या काळात देखील तो आपल्या चाहत्यांना एका नव्या भूमिकेची ट्रीट देणार आहे. तो चित्रपट आहे द गुड. या मध्ये संजय दत्त एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यापूर्वी संजय दत्तनं काही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना भावल्या. त्यामध्ये पानिपतचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. यावर्षी संजय दत्तचा भुज द प्राईड ऑफ इंडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
आता संजू बाबा त्याच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना सामोरा जाणार आहे. सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्येही संजय दत्तची उपस्थिती हा त्याच्या चाहत्यांसाठी वेगळा विषय असतो. बॉलीवूडमध्ये वादग्रस्त राहिलेल्या या अभिनेत्यानं मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याच्या चित्रपटांचा एक खास प्रेक्षक आहे. जो त्याच्यावर निस्सीम प्रेम करतो. ‘द गुड महाराजा’ एक आगामी इंडो-पॉलिश युद्धावर आधारित चित्रपट आहे. दिग्दर्शन विकास वर्मा यांनी केली आहे. त्यामध्ये संजय दत्त हा नवानगर महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं या भूमिकेसाठी विशेष मेहनत देखील घेतली आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र पुढील वर्षी ख्रिसमसच्या वेळी तो प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

Comment here