City News

भाजप नगरसेवकाचं धक्कादायक कृत्य; भररस्त्यात महिला तलाठीला मारहाण.

नंदुरबार, 6 जून : भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा हिला नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरात मधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीसाठी आवश्यक पावती नव्हती. म्हणून या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरा सह अन्य दोन महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसिलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेले नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठीमध्ये वाद झाला.

Comment here