Film & entertainment

मालदीवच्या समुद्रकिनारी अर्जुनकडून मलायकाला रोमँटिक सरप्राइज; नेटकरी म्हणाले..

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले. या रोमँटिक मालदीव व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे दोघं सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी अर्जुनने मलायकाला रोमँटिक सरप्राइज दिल्याचा हा व्हिडीओ आहे. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या हार्डी संधूच्या बिजली-बिजली या गाण्यावर अर्जुनने मलायकाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून समुद्रकिनाऱ्याकडे ती चालताना दिसतेय. किनाऱ्यावरील वाळूत हृदयाच्या आकाराची रोषणाई करत रोमँटिक डिनरचा प्लॅन अर्जुनने केला. अर्जुनचा हा सरप्राइज नेटकऱ्यांनाही फार आवडला असून अनेकांनी त्यावर कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने या दोघांना विचारलं, ‘लग्न कधी करणार आहात?’ तर आणखी एकाने म्हटलं, ‘भावा, विकीसोबत तू सुद्धा लग्न करून टाक.’ अभिनेता सिकंदर खेरनंही या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे.

Comment here