City News

शाही भोज 1 थाळी च्या ऑर्डर वर 2 थाळी ऑफरचे अमिष ; अनेकांना लाखोंचा गंडा

Aurangabad, 9 June. शाही भोज थाळीच्या एका ऑर्डरवर दोन थाळी फ्री असा मॅसेज फेसबुकवर व्हायरल करून गेल्या आठ महिन्यापासून भामट्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नुकतेच एका उद्योजकाला दीड लाखांना याच भामट्याने गंडविले आहे. त्यानंतर आता हॉटेल भोजचे मालक अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन करत अशी कोणतीही ऑफर नसल्याचे सांगत सतर्क राहण्याचे आवाहन मंगळवारी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी अशोक अग्रवाल, अंकित अग्रवाल आणि सतीश अग्रवाल उपस्थित होते. फेसबुकवर भामट्याने हॉटेल भोज थाळीचा संपर्क Kक्रमांक शोधला. त्यानंतर भोज थाळी नावाने बनावट फेसबुक खाते उघडले. त्यावर एका थाळीच्या ऑर्डरवर दोन थाळी मोफत अशी जाहिरात देऊन एक मोबाईल क्रमांक टाकला. मोफत थाळीच्या आमिषाने शहरातील अनेकांनी त्या भामट्याच्या क्रमांकावर संपर्क करून थाळी ऑर्डर केली. तेव्हा त्याने डेबिट कार्डद्वारे सुरुवातीला 10 रुपये पाठवण्यास सांगून नंतर any desk हे ऍप डाउनलोड करण्यास सांगून लोकांच्या खात्यातून पैसे लांबवले. हा प्रकार गेल्या सात ते आठ महिन्यापासून सुरू आहे. याबाबत अग्रवाल यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हा त्या भामट्याचे आयपी अड्रेस ब्लॉक केले होते. मात्र, वारंवार तो वेगळ्या ठिकाणाहून त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. याबाबत फेसबुकने देखील त्या भामट्याचे पेज हटविण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे अंकित अग्रवाल यांनी सांगितले. सुमारे 20 ते 25 लोकांनी याबाबत भोज हॉटेलकडे तक्रार केली. प्रत्येकाचे 20 ते 25 हजार भामट्याने लांबवले आहेत. त्यामुळे लोकांनी भोज थाळी ऑफरच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे

Comment here