City News

राज क्लॉथ स्टोअर्सला ठोकण्यात आले सील..टाळेबंदीत कुलूपबंद शटरमागे ग्राहकी सुसाट

Aurangabad. 21 May. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत कापड दुकानांसह इतर दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहाराचा आज पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पर्दापाश केला.आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध अद्यावत व प्रशस्त राज क्लॉथ स्टोअर्स वर सकाळी अचानक छापा टाकून येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पकडण्यात आले.दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करून दुकानाला सील ठोकण्यात आले.
जिल्ह्यात सर्वत्र टाळेबंदी असताना शहरात कुलूपबंद सेंटर च्या आत सर्रास ग्राहकांची गर्दी होत आहे. ग्राहक दुकानात गेल्यानंतर शटर ओढून कुलूपबंद करण्यात येते. खरेदी संपल्यावर आतून शटरवर ठोका मारले की कुलूप उघडून ग्राहकांना बाहेर काढण्यात येते. ताळेबंदीतही व्यवहार सर्रास सुरू ठेवण्याचा हा फडा व्यापार्‍यांनी शोधून काढला आहे. परिणामी जिल्हाधिकार्‍यांच्या टाळेबंदी आदेशाला खो देण्यात येत असून वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चैन संकल्पनेला हरताळ फासला जात आहे.ही बाब हेरून अशा स्थितीत प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या काळात दुकानदारांची मक्तेदारी आणि नागरिकांच्या बेफिकीरीकडे पोलिस, पालिकेचे दुर्लक्ष होत होते असा गैरसमज हे दुकानदार व्यक्त करत होते. अखेर शुक्रवारचा मुहुर्त मोठ्या कारवाईसाठी यशस्वी ठरला.आज सकाळी आकाशवाणी चौकातील पाटबंधारे विभागाच्या ऑफिससमोर असलेल्या प्रशस्त आणि आद्यवत राज
क्लॉथ स्टोअर्स वर पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह पथकाने छापा टाकला यावेळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी दिसून आली.औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात २०२१ या वर्षात कोरोना संसर्गाचा वेग अधिक वाढला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर एप्रिल महिन्यात बाधितांची संख्या अधिक झाली आहे.प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी लागू केली परंतु बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते.अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान,भाजीपाला सकाळी सात ते अकरापर्यंत सुरु असताना बाजारपेठेतील कापड व्यापारी, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्सचे दुकाने छुप्या पद्धतीने सुरु ठेवण्यात येत होती.शहरात अनेक व्यवसायिकांनीं बंद दुकान आड ग्राहकांना साहित्य विक्रीचा नवीन फडा अवलंबिला आहे. दुकानांचे शटर कुलूपबंद करून ग्राहकांना दुकानात सोडण्यात येते एक व्यक्ती दुकानाबाहेर बसून असतो ग्राहक आले की कुलूप उघडून अर्धे शटर करून ग्राहकांना आज सोडण्यात येते. वस्तू खरेदी झाल्यावर शटर वाजेविले की कुलूप उघडून ग्राहकांना बाहेर सोडण्यात येते. प्रशासनाला चकवा देण्यासाठी नवीन युक्ती शोधण्यात आली असून शटर बंद जरी असले तरी दुकानाच्या आत ग्राहकांची गर्दी होत आहे.शासकीय रुग्णालयाचे कोविड सेंटर व खासगी कोवीड केअर सेंटर मध्ये नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाही अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा वेग मंदावला नाहीतर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत असून कुलूप बंद सेंटरच्या मागे होणार्‍या गर्दीमुळे गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करून घेण्यासाठी पालिकेने विशेष पथक स्थापन केले. मात्र, या पथकाकडून अपेक्षित कडेकोट पालन केल्या जात नसल्याने व्यावसायिकाकडून टाळेबंदी नियमांचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे.आज मात्र पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान बाहेरून बंद आणि ग्राहक दुकानात असलेल्या दुकानाचा पर्दापाश केला.आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध अद्यावत व प्रशस्त राज क्लॉथ स्टोअर्स वर सकाळी अचानक छापा टाकून येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पकडण्यात आले.दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करून दुकानाला सील ठोकण्यात आले.या झालेल्या कारवाईने चोरी चोरी चुपके चुपके दुकान उघडणाऱ्या दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसून आले.

Comment here