City News

ओरंगाबादवासीयांना दिलासा; जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर सव्वादोन टक्के

Aurangabad, 5 June, Corona update. दोन महिन्यांपूर्वी ३० टक्क्यांच्या चिंताजनक पातळीपर्यंत गेलेला शहरातील पॉझिटिव्हिटी रेट (झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण) गुरुवारी २.२६ टक्क्यांपर्यंत खाली आहे. करोनासंकटामुळे लॉकडाउनसह निर्बंधांना तोंड देत असलेल्या औणि औषधटंचाईने धोक्यात आलेल्या शहरवासीयांसाठी ही मोठीच दिलासादायक बाब आहे. अर्थात, पॉझिटिव्हिटी रेट घटला असला तरी गाफील राहून चालणार नाही, करोनाचे नियम पाळून खबरदारी घ्यावीच लागेल, असे महापालिकेने म्हटले आहे. करोना संसर्गाबाबत गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादची स्थिती सुधारते आहे. पाच-सात दिवसांपासून शहरातील नवी रुग्णसंख्या दोन आकड्यांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या घटत असताना पॉझिटिव्हिटी रेटदेखील घटू लागला आहे.

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तीस टक्क्यांवर होता, आता तो २.२६ टक्क्यांवर आला आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ज्या ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी असतो त्या ठिकाणची साथ नियंत्रणात आली आहे, असे मानले जाते.

औरंगाबाद शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी नियम पाळलेच पाहिजेत. त्यात कुचराई करून चालणार नाही. मास्क लावणे, सतत हात धुणे आणि सुरक्षित वावर ठेवणे ही त्रिसूत्री प्रत्येकाला पाळावीच लागेल. गर्दी करणे टाळावे लागेल. नियम न पाळल्यास परिस्थिती पुन्हा बिकट होऊ शकेल.

डॉ. नीता पाडळकर

वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Comment here