City News

MSRTC Electric Buses | आता लवकरच धावणार इलेक्ट्रिक एसटी ! पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि महाबळेश्वरचा प्रवास होणार ‘सुखद’

¯

पुणे :  MSRTC Electric Buses | वाहन घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरच्या वाहनांची संख्या वाढत आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याचं दिसत आहे. तसेच, सध्याचं वाढतं प्रदूषण या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पुढाकाराने अनेक राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जातेय. यावरून महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जातेय. अशातच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC Electric Buses) देखील पुढाकार घेतला आहे. आता एसटी देखील लवकरच इलेक्ट्रिक बस वापरणार आहे. येत्या काळामध्ये राज्यात इलेक्ट्रिक एसटी (ST) दिसणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आता एसटी प्रशासन 100 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली झाली आहे. लवकरच याबाबत अध्यादेश काढला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, भाडेतत्वावर घेणाऱ्या 100 पैकी 30 बसेस पुणे विभागात येणार आहेत. या बसेसची आसनक्षमता 43 असणार आहे. आगामी ६ महिन्यामध्ये पुणे स्टँडवरून राज्यातील 5 शहरांसाठी इलेक्ट्रिक एसटी धावणार आहे. यात 1- पुणे-औरंगाबाद, 2- पुणे-नाशिक, 3- पुणे-कोल्हापूर, 4- पुणे-सोलापूर, 5- पुणे-महाबळेश्वर या 5 शहरांसाठी पुण्याहून इलेक्ट्रिक बसेस धावणार आहे.

Comment here