City News

आर्यनला वाचवण्यासाठी दादलानीने गोसीवाला ५० लाख दिले, सॅमचा गौप्यस्फोट

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तुरुंगातून सुटला असला, तरी या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता शाहरुखन खानची मॅनेजर पूजा दादलानीने आर्यनला वाचवण्यासाठी के.पी.गोसावीला ५० लाख रुपये दिल्याची नवीन माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सॅम डिसूझाने हा दावा केला आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून सॅम डिसूझाचे नाव घेतले होते. सॅम डिसूझाने एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत हा खळबळजनक दावा केला आहे. पूजा दादलानीने आर्यनला अटकेपासून वाचवण्यासाठी पैसे दिले होते. पण आर्यनची सुटका शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर ते सर्व पैसे परत केले, असे डिसूझाने म्हटले आहे. डिसूझा बिझनेसमॅन आहे. पूजा दादलानीने ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या के.पी.गोसावीला ५० लाख रुपये दिले होते. पण गोसावी फसवणूक करु शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याने गोसावीला ते सर्व पैसे दादलानीला परत करायला सांगितले. प्रभाकर साईलने त्याच्या प्रतिज्ञापत्रात गोसावी, दादलानी आणि डिसूझा ३ ऑक्टोबरला सकाळी भेटले होते, असे म्हटले आहे. एक व्यक्ती कारमधून आली, तिने साईलकडे दोन बॅगा दिल्या. ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबलेल्या डिसूझाकडे साईल या दोन बॅग घेऊन गेला. डिसूझाने पैसे मोजले व फक्त ३८ लाख रुपये असल्याचे सांगितले, प्रतिज्ञापत्रात ही सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.”गोसावी फोनवरुन कोणाबरोबर तरी बोलत असताना, २५ कोटी रुपयाची मागणी केल्याचं आपण ऐकलं, त्यातले आठ कोटी रुपये समीर वानखेडेंना देणार असल्याचं ते बोलत होते” असा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. “आम्ही गोसावीवर दबाव टाकून त्याच्याकडून ३८ लाख रुपये परत मिळवले. उर्वरित रक्कम आम्ही मॅनेज करुन दादलानीला परत केली. गोसावी चिटर असल्याचं आमच्या लक्षात आलं” असं डिसूझा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

Comment here