City News

औद्योगिक संघटेनेद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद ला ऑक्सीजन जनरेशन प्लॅट (एरॉक्स निर्मित) चा लोकार्पण सोहळा सम्पन्न

Aurangabad, 8 June. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चर(सी.एम.आय.ए.) या प्रतिथयश औद्योगिक संघटेनेद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद ला ऑक्सीजन जनरेशन प्लॅट (एरॉक्स निर्मित) चा लोकार्पण सोहळा आज सोमवार दि.७ जून २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता सम्पन्न झाला. या ऑक्सीजन जनरेशन प्लँट चे लोकार्पण औरंगाबाद येथील लोकप्रतिनिधीच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा.श्री भागवत जी कराड, खासदार, राज्य सभा, मा.श्री इम्तियाज जलील, खासदार, मा.आमदार, श्री संजय शिरसाठ, मा.आमदार, श्री. सतिश चव्हान, औरंगाबाद चे जिल्हाधीकारी, मा.श्री सुनिल चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष, डॉ.एम.एम.गोंदवले, सी.एम.आय.ए.चे अध्यक्ष, श्री कमलेश धुत, उपाध्यक्ष, श्रि शिवप्रसाद जाजु, सचिव, श्री सातिश लोणीकर, माजी अध्यक्ष, श्री राम भोगले, शासकीय महाविद्यालय तथा रूग्णालय (घाटी) च्या अधिष्ठाता, डॉ.कानन येळीकर, डॉ.बजाज, डॉ.मिनाक्षी भट्टाचार्या, तचेस सर्व देणगीदार उद्योगांचे प्रतिनीधी, सी.आय.आय. चे अध्यक्ष, श्री रमण अजगावकर, उपाध्यक्ष, श्री प्रसाद कोकीळ, मसिआ चे अध्यक्ष, श्री नारायण पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तवीक आणि सुत्रसंचलन केले सी.एम.आय.ए. चे उपाध्यक्ष, श्री शिवप्रसाद जाजु यांनी केले त्यांनी. ते म्हणाले या ऑक्सीजन प्लँट ची क्षमता १२५ सिलींडर प्रतिदीन इतकी आहे. मागील काही दिवसांपासून कोव्हीड-१९ रूग्णांना उपाचार करण्यासाठी ऑक्सीजन ची कमतरता भासत होती या साठी सी.एम.आय.ए.च्या माध्यमातून २३ सदस्यांनी दिलेल्या योगदानातून हा प्लँट मुर्त स्वरूपास अला आहे.

Comment here