City News

प्रियेसीची छेड काढली म्हणून दगड डोक्यात टाकून केला खून

Aurangabad, 9 June. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना ०७ जून रोजी त्यांचे खब-या मार्फत माहीती मिळाली की, दादाराव सांडु सोनवणे याचा मारेकरी जाधववाडी भाजीमंडी मधील जय मल्हार हॉटेलवर चहा पिण्यासाठी आलेला आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सादर ठिकाणी सापळा रचत आरोपीला पकडण्यासाठी गेले असता आरोपी पोलिसांना बघून पळ काढत असतानाच पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचार पीस केली असता त्याने त्याचे नाव सुनिल जयसिंग निंभोरे, वय २३ वर्षे, धंदा मिस्तरी काम, रा. मिसारवाडी, गल्ली नं. ०४, औरंगाबाद असे सांगितले. त्यास दादाराव सोनवणे यांच्या खुनाच्या अनुषंगाने विचारपुस केली 20 मे रोजी रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास मी व माझी प्रीयेसीला सोबत घेवुन जाधववाडी भाजीमंडी मधील सृष्टी एजन्सीच्या छतावर अंधार असलेल्या जिन्याने वर झोपण्यासाठी गेलो असता तेथे अगोदरच दादाराव सोनवणे बसलेला होता. दरम्यान मी लघुशंकेसाठी बाजुला गेलो असता दादाराव ने माझ्या प्रेमिकेसोबत छेडछाड केल्याने त्याचा मला राग अनावर झाल्याने दादाराव सोनवणे यास छतावर खाली पाडुन बाजुला पडलेल्या सिमेंटचा दगड उचलुन त्याचे डोक्यावर दोन ते तीन वेळेस जोराने मारुन त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता ,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०२, दिपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा साळोखे, सिडको पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शना खाली पो.स्टे. सिडको येथील पोउप निरीक्षक बाळासाहेब आहेर,कल्याण शेळके, पोलीस अंमलदार नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, विजयानंद गवळी, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी, विशाल सोनवणे, गणेश नागरे यांनी केली आहे.

Comment here