World

ओमिक्रॉन पसरला 38 देशांमध्ये! अद्याप एकही मृत्यू नाही

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ने शुक्रवारी सांगितले की, कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (Omicron) हा आतापर्यंत 38 देशांमध्ये पसरला आहे. नवीन कोविड-19 प्रकार ओमिक्रॉनमधून आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएन आरोग्य एजन्सीने अद्याप ओमिक्रॉन-संबंधित मृत्यूचे अहवाल पाहणे बाकी आहे. ते म्हणाले की ओमिक्रॉन कसा आहे हे निर्धारित करण्यासाठी अनेक आठवडे लागतील.

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिंएट पसरला आहे. कॅलिफोर्नियामध्ये पहिल्या ज्ञात प्रकरणाची नोंद झाल्यानंतर फक्त एक दिवसानंतर, तपासणीत असे दिसून आले की, ओमिक्रॉनने न्यूयॉर्क शहरातील किमान पाच लोकांना तसेच नोव्हेंबरच्या शेवटी मॅनहॅटन येथे एका परिषदेत भाग घेतलेल्या मिनेसोटातील व्यक्तीला संसर्ग झाला होता. अधिकाऱ्यांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत प्रवास केलेल्या कोलोरॅडोच्या महिलेला संसर्ग झाल्याचे कळवले.
तेथील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, लसीकरण न झालेल्या, अलीकडे कुठेही प्रवास न केलेल्यांनादेखील ओमिक्रॉन होतोय. ओमिक्रॉन किती सांसर्गिक आणि धोकादायक आहे याचा अभ्यास सध्या तज्ञ करत आहेत. अमेरिकन राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशावेळी घाबरण्याची गरज नाहीयेय. काही संक्रमित लोकांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांनी अलीकडेच घरापासून लांब प्रवास केला नव्हता, याचा अर्थ असा होतो की हा विषाणू अमेरिकेच्या काही भागांमध्ये आधीच पसरला होता.

मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये ओमिक्रॉन

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आशियामध्येही पसरू लागला आहे. मलेशियाचे आरोग्य मंत्री खैरी जमालुद्दीन यांनी सांगितले की, देशात ओमिक्रॉनचा पहिला केस नोंदवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका परदेशी प्रवाशामध्ये एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. हा प्रवासी 19 नोव्हेंबरला सिंगापूरमार्गे मलेशियाला पोहोचला होता. त्याचवेळी, श्रीलंकेत कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण नोंदवला गेला. देशाच्या आरोग्य सेवा उपमहासंचालक हेमंता हेरथ यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, प्रयोगशाळेतून एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली. अधिकाऱ्याने सांगितले की, आफ्रिकन देशातून आलेला हा व्यक्ती सध्या त्याच्या कुटुंबीयांसह आहे. दक्षिण आफ्रिकेतून सिंगापूरला परतलेल्या दोन प्रवाशांमध्येही ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, येथे आल्यानंतर दोन्ही प्रवाशांची टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये ते ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले.

Comment here