Film & entertainment

‘सूर्यवंशी’ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने समाधानकारक कमाई केली. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी २६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी ‘इटर्नल्स’ हा हॉलिवूड चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तुलनेत ‘सूर्यवंशी’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगसुद्धा जास्त झाली होती.
बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यवंशीच्या सुरुवातीच्या कमाईचा आकडा हा गोलमाल अगेनसारखाच आहे. मात्र महाराष्ट्रात सिनेमागृहांमध्ये ५० टक्के क्षमतेची अट असल्याने मुंबईतील कमाई कमी होऊ शकते.
‘इटर्नल्स’नेही ८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कोरोनाच्या संकटानंतर सिनेमागृहांमध्ये झालेली ही समाधानकारक कमाई म्हटली जात आहे. सूर्यवंशी हा चित्रपट ६६ देशांमधील १३०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. मार्च २०२० मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

Comment here