City News

मुंबई, उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

मुंबई: राज्यात मुसळधार पाऊस बरसेल अशा इशारा हवामान खात्याने देताच मुंबई (Mumbai) आणि उपनगात (Suburban) पावसाने खरोखरंच हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार (Heavy Rainfall) हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मुसळधार पाऊस आणि लोकल (Mumbai Local Trains) सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने चाकरमान्यांचे (Office Going crowd) चांगलेच हाल झाल्याचे चित्र दिसले. भर पावसात हातातील एका हातात ऑफिसची बॅग आणि दुसऱ्या हातात छत्री (Umbrella) सांभाळत चाकरमान्यांना बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. मुंबईत पाऊस पडला की सखल भागात पाणी साठण्याची भीती कायमच असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारे पाणी साठलं तर बससेवांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. (Heavy Rainfall in Mumbai Thane Navi Mumbai Panvel Dadar Office going crowd Local Trains Bus services affected)
पश्चिमी मोसमी वारे अरबी समुद्र किनाऱ्यावर घोंघावत आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. ही परिस्थिती मोसमी पावसासाठी अनुकूल असून येत्या 24 तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, बुधवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्र किनारी पश्चिमी मोसमी वारे वेगाने वाहू लागले आहेत. दक्षिण कोकणात दाखल झालेला मान्सून हळूहळू संपूर्ण राज्यात पसरू लागला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभर मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील स्थानिक हवामान खात्याने पुढील 5 दिवस हवामानात बदल होण्याचा इशारा दिला असून जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.

Comment here