City News

Jalna Water Crisis: 10 days no water in taps ; when asked done this action

Jalna Water Crisis: पाणी येत नसल्याने जालन्यात काही नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी धडक दिली. या नागरिकांना ताब्यात घेऊन सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या जालन्याच्या शिवनगर भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गेलेल्या चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (सुभाष पितांबरे, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत नाईक आणि विष्णू नाईकनवरे अशी या नागरिकांची नावे आहेत. ते बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी निवासस्थान येथे गेले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून, ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी दिली. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

जुन्या जालन्यातील शिवनगर भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही. या भागात नगरपालिका पाणीपुरवठा करते मात्र पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त होते. त्यामुळे नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना जाब विचारायचे ठरवले. त्यानुसार सुभाष पितांबरे, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत नाईक आणि विष्णू नाईकनवरे हे बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास थेट जिल्हाधिकाऱ्यंच्या घरी दाखल झाले. तिथे या चौघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

Comment here