City News

मॉल, चित्रपट गृहे देखील सुरू मग कोचिंग क्लासेस बंद का.. ???

Aurangabad, 10 June. कोरोनाचा आकडा कमी झाला असल्याने शहरातील निर्बंध हटविण्यात आले आहेत.मॉल, चित्रपटगृहे देखील खुली करण्यात आले आहेत.ज्ञानदानाचे काम करणारे कोचिंग क्लासेस मात्र अद्यापही बंद का ठेवले ?असा प्रश्न उपस्थित करून कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने आज सकाळी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यन्त मानवी साखळी तयार करून कोचिंग क्लासेस खुली करण्यास परवानगी देण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

मागील १६ महिन्यापासून राज्यभरातील कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने संबंधित संचालक, खासगी कोचिंग क्लासेस व शिक्षकेतर कर्मचारी हे आर्थिक संकटात सापडले आहे.या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सकाळी क्रांती चौकात कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने मानवी साखळी तयार करून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच क्लासेसच्या वतीने तयार केलेल्या नियमावलीनुसार सोशल डिस्टसिंग,स्यानीटाइझर चा वापर करू, पालकांचे संमती पत्र घेऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. कोचिंग क्लासेस जागा मालकांनी भाडे माफ करण्यासंबंधीत शासनाने त्वरित अध्यादेश काढुन एक वर्षाचे लाईट बिल, जीएसटी व्यवसाय कर, आयकर कर, स्थानिक कर माफ करा, याशिवाय कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना १ एप्रिल पासून ते कोचिंग क्लासेस पूर्ववत सुरू होईपर्यंत कोचिंग क्लासेस संचालकांना प्रतिमाह ४० हजार रुपये व खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना प्रतिमाह २० हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच सर्व कोचिंग क्लासेस संचालकांना कोचिंग क्लासेस व्यवसायिक म्हणून सरकारी बँकांतून कर्ज देण्याची व्यवस्था करावी. सर्व सुरळीत झाल्यानंतर हप्ते भरण्याची मुभा द्यावी. क्लासेस क्षेत्राचा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना मुद्रा लोन देण्यात यावेत अशा विविध मागण्या कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. पी.एम. वाघ, कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत बनसोड, प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, प्रा. संदीप मस्के, कोषाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब मस्के, प्रा. अजाबराव मनवर, प्रा.प्रशांत ढाकणे, प्रा. अरुण पठारे सह आदींच्या वतीने करण्यात आल्या.

Comment here